इलेक्ट्रिक कारसाठी ईईएसएल एक हजार चार्जिंग स्टेशन्स उभारणार

251

विजेवर चालणाऱया वाहनांची वाढती संख्या विचारात घेऊन एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) देशभरात एक हजार सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्स उभारणार आहे. त्यासाठी ईईएसएलने बीएसएनएलशी करार केला आहे. त्यामुळे चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी बीएसएनलच्या जागा उपलब्ध होणार आहेत.

देशात इलेक्ट्रिनिक वाहनांबाबत ग्राहकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे, त्यांचा वापर वाढावा म्हणून ईईएसएल प्रयत्नशील आहे. त्यानुसार देशभरात वाहनांच्या चार्जिंग स्टेशन्सचे जाळे उभारण्यावर भर दिला असल्याचे ईईएसएलचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ कुमार यांनी सांगितले. तसेच चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा खर्च ईईएसएल करणार असले तरी बीएसएनएलशी करार केल्याने पुरेशी जागा आणि विजेची जोडणी देण्याची जबाबदारी त्यांची असेल असे सौरभ कुमार यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या