इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी ‘ईईएसएल’ आणि ‘एचपीसीएल’ एकत्र काम करणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात विजेवर चालणाऱया इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर या वाहनांसाठी सक्षम सार्वजनिक चार्जिंग व्यवस्था उभारण्यासाठी एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (एचपीसीएल) कंबर कसली आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रोगॅमअंतर्गत चार्जिंग व्यवस्था उभारण्यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये सामंजस्य करार झाला आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत असून त्याच्या वापरामुळे वायुप्रदूषण मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून विजेवर चालणाऱया वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी चार्जिंग व्यवस्था उभारण्याकरिता दोन्ही कंपन्या एकत्रितपणे काम करणार आहेत. देशात सक्षम अशी वाहन चार्जिंग व्यवस्था निर्माण करण्यासाठी आम्ही काम करणार असल्याचे ईईएसएलचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ कुमार यांनी सांगितले.