वीज कामगारांना बोनस मिळणार , बोनसची रक्कम तीन-चार दिवसांत निश्चित होणार 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणमध्ये काम करणाऱया जवळपास 86 हजार वीज कामगारांना दरवर्षीप्रमाणे दिवाळी बोनस मिळणार असल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

त्यामुळे वीज कामगारांच्या संघटनांनी ग्राहकांची गैरसोय होईल असे संपाचे पाऊल उद्या शनिवारी उचलू नये असेही उर्जामंत्र्यांनी आवाहन केले आहे. दरम्यान वीज कंपन्यांच्या व्यवस्थापनासोबत चर्चा करून तीन-चार दिवसात बोनसची रक्कम जाहीर केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोना महामारीमुळे वीज कंपन्या आर्थिक चणचणीचा सामना करत असल्याने व्यवस्थापनाने कामगारांना बोनस देण्यास नकार दिला होता. त्यामुळे राज्यभरातील सर्व 25 वीज कामगार संघटनांनी एकत्र येत शनिवारी एक दिकसाचा संप करण्याचा इशारा दिला आहे. ऐन लक्ष्मीपूजनादिवशी होणाऱया या संपामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची भीती व्यक्त होत होती. त्यामुळे उर्जामंत्र्यांनी अखेरच्या क्षणी वीज कामगारांना बोनस देणार असल्याचे जाहीर करत कामगारांनी संप करू नये असे आवाहन केले असल्याचा संदेश महावितरणच्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात आला आहे.