माजलगाव तालुक्यात विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । माजलगाव

हातात घेतलेल्या वायरमध्ये अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील मोगरा तांडा येथे रविवारी सकाळी घडली आहे. मोगरा तांडा येथे रविवारी सकाळी 10 वाजता मीरा शंकर जाधव (वय 35) व तिचा आतेभाऊ दत्ता रेखा राठोड (वय 25) वीजप्रवाह सुरू करण्यासाठी प्रयत्न करत असताना अचानक हातातील वायरमध्ये वीज प्रवाह सुरू झाला. त्यामुळे शॉक लागून त्यात दोघांचाही मृत्यू झाला. त्यांना माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले .