
सोनई येथील यश अॅक्वा इंडस्ट्रीज कंपनीवर वाशीतील महावितरणच्या भरारी पथकाने छापा टाकला. त्यात लाखो रुपयांची वीज चोरी पकडण्यात आली आहे. मीटरमध्ये रिमोटद्वारे फेरफार करुन वीजचोरी होत असल्याचे उघडकीस आले आहे. सुमारे 32 हजार 488 युनिट चोरी केल्याप्रकरणी कंपनीला 20 लाखांचा दंड ठोठावल्याने खळबळ उडाली आहे.
सोनई येथे खरवंडी रोडवर असलेल्या यश अक्वा इंडस्ट्रीज या कंपणीला 140 लोड मंजूर असून 32 के.वी. विज उपकेंद्र सोनई येथून स्वतंत्र विज पुरवठा केला जात होता. कारखान्यास 32 के.वी. तून विज पुरवठा केला जात असताना कंपनीत व उपकेंद्रावर मीटर असताना कारखान्यात रिमोटद्वारे मीटरमध्ये फेरफार करुन लाखो रुपयांची विज चोरी करत असल्याची माहिती वाशीतील भरारी पथकाला 17 डिसेंबरला मिळाली होती. त्यानंतर या पथकातील अॅडीश्नल एक्झीकेटीव्ह इंजीनियर, फ्लाईंग स्कॉड यांनी सोनई येथे येऊन कंपनी परिसरात दोन दिवस रेकी केली. या कंपनीत दिपयश नावाने मिनरल वॉटर व इतर प्रॅडक्स बनविले जातात. महावितरणच्या भरारी पथकाने छाप्याबाबत गुप्तता पाळली होती. 140 मंजुर लोड ए.पी.च्या 10000 रुपये कंपाडींग दंडप्रमाणे एकून 32 हजार 488 युनिट चोरुन वापरल्याने व इतर दंडासह वीस लाख सहा हजार 576 दंड ठोठावला. भरारी पथकाने नगर येथील अधिक्षक अभियंता कार्यालयात याबाबत गंभीर गुन्ह्याची नोंद केली असून कारखानदार दिप धनवटे यांनी दंड न भरल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी कंपनीच्या मालकांनी विज चोरीचा गुन्हा कबून केला आहे. 3 हप्त्यात ही रक्कम भरण्याचे आदेश काढले आहेत. या पहिला हप्ता 6 लाख 53 हजार रुपये रोख भरल्याची माहिती अधिक्षक कार्यालयातून देण्यात आली.



























































