
एलॉन मस्क यांची एआय कंपनी एक्सएआयने आपल्या ग्रोक एआय चॅटबॉटच्या चुकीच्या व्यवहारावरून माफी मागितली आहे. कंपनीने कबूल केले की, ग्रोक एआयने काही यूजर्ससोबत चुकीची भाषा वापरली आहे. हिटलर यांची स्तूती आणि काही वादग्रस्त शब्द ग्रोकने वापरल्याचे एक्सएआयने म्हटले आहे. अनेक युजर्सने तक्रारी केल्या आहेत की, त्यांनी ग्रोक एआयला काही प्रश्न विचारले असता ग्रोकने त्यांना शिव्या दिल्या. तसेच हुकूमशहा हिटलर यांची स्तुती केली. या प्रकारावरून सोशल मीडियावर कंपनीवर मोठी टीका करण्यात आली. यानंतर एक्सएआयने याची चौकशी करून एक चुकीचा कोड अपडेट केला. ग्रोक बोटमध्ये अपस्ट्रीम कोडमध्ये एक जुना अपडेट असल्याने ही सर्व घडल्याचे कंपनीने म्हटले. ही समस्या चॅटबॉटच्या लँग्वेज मॉडलशी जोडलेली नव्हती. जुना कोड 16 तासांपर्यंत ऑक्टिव राहिल्याने ही सर्व गडबड झाल्याचेही कंपनीने कबुली दिली.