
काही वर्षांपूर्वी ई-मेल पाठवणे किंवा आलेले ई-मेल वाचणे यांची क्रेझ होती. लोक एकमेकांचे ई-मेल आयडी आवर्जून नोंद करून घ्यायचे. मात्र इन्स्टंट मॅसेजिंग अॅपच्या प्रसारात लोक ई-मेल्सचा वापर हळूहळू कमी करत आहेत. 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये ई-मेलची लोकप्रियता कमी होत आहे. त्याऐवजी व्हॉट्सअॅप, टेलिग्राफ, गुगल डॉक्स आणि झूम यासारख्या प्लॅटफॉर्मला पसंती दिली जात आहे, अशी माहिती डेलॉएट पंपनीच्या सर्व्हेतून दिसून आली आहे. लोकांना आता ई-मेल पाठवणे पंटाळवाणे वाटत आहे. वर्ष 2020मध्ये 46 टक्के कर्मचाऱयांनी मान्य केले की त्यांना ई-मेलच्या माध्यमातून कामाच्या वेळी खूप तणाव जाणवतो. म्हणूनच ते अन्य मॅसेंजिंग अॅपकडे वळत आहेत. जगभरातील सुमारे 400 कोटी लोक कोणत्या ना कोणत्या कामासाठी ई-मेलचा वापर करतात. प्रत्येक व्यक्तीला जेवढे ई-मेल येतात, त्यातील सरासरी 200 ई-मेल तर वाचले जात नाहीत, असेही दिसून आलेय.



























































