एमिरेट्स एविस शोफर युनिटच्या कामगारांचा पगार पूर्ववत, भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांना यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांना यश आले असून एमिरेट्स एविस शोफर युनिटच्या कामगारांचा पगार पूर्ववत करण्यात आला आहे. कोरोनाकाळात कंपनीने कामगारांचा पगार कमी केला होता. दरम्यान, पगार पूर्ववत झाल्यामुळे कर्मचाऱयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

एमिरेट्स एविस शोफर युनिटच्या कामगारांच्या समस्या लक्षात घेऊन भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संदीप (आप्पा) राऊत यांच्या प्रयत्नांनी कामगारांच्या मागील पगारात वाढ करण्यात आली आहे. याबद्दल कर्मचाऱयांनी भारतीय कामगार सेनेचे आभार मानले आहेत. नुकतेच युनिटच्या वतीने भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संदीप (आप्पा) राऊत यांच्यासह युनिट अध्यक्ष विनोद गायकवाड आणि सेक्रेटरी योगेश शेजवळ यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.