या कंपनीत कर्मचारी स्वतःच ठरवतात स्वतःचा पगार!

2827

वाचून विचित्र वाटेल पण हो, हे खरं आहे. या जगात एक अशीही कंपनी आहे, जिचे कर्मचारी स्वतःच स्वतःचा पगार ठरवू किंवा त्यात वाढ करू शकतात. नुकतीच एका महिलेने स्वतःचा पगार सहा लाखांनी वाढवल्याने ही कंपनी चर्चेत आली आहे.

या कंपनीचं नाव आहे ग्रांट ट्री. लंडनस्थित ही कंपनी अनेक व्यावसायिक कंपन्यांना सरकारी निधी मिळवून देण्यासाठी मदत करते. या कंपनीत तब्बल 45 लोकं काम करतात. हे सगळे कर्मचारी स्वतःचा पगार स्वतः ठरवतात. त्यांना वाटलं तर ते स्वतःचा पगार वाढवू अगर कमीसुद्धा करू शकतात. नुकतंच या कंपनीत काम करणाऱ्या सिसिलिया मंडुका नावाच्या महिलेने तिचा पगार 27 लाख प्रतिवर्षं इतका मिळणारा पगार 33 लाख रुपये प्रतिवर्षं इतका केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, तिला दिलेल्या कामाच्या तुलनेने तिने अधिक काम केलं होतं. त्यामुळे तिला स्वतःचा पगार वाढवण्याची संधी मिळाली.

पण, हा पगार वाढवण्यासाठीही काही अटी आहेत, ज्यांची पूर्तता तुम्हाला करावीच लागते. त्यातली पहिली आणि मुख्य अट अशी आहे की, तुम्हाला आधी तुमच्या कामासाठी या कंपनीत किती पगार मिळू शकतो याची खात्री करून घेणे. म्हणजे कर्मचारी वाट्टेल तो आकडा सांगू शकत नाही. त्यानंतर तुमच्या सहकाऱ्यांना तुमच्या प्रस्तावाबाबत चर्चा करावी लागते. अर्थात सहकाऱ्यांच्या सहमतीने फारसा फरक पडत नाही, पण ही प्रक्रिया पार पाडावीच लागते. त्यानंतरच कर्मचारी स्वतःचा पगार वाढवून घेऊ शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या