जम्मू कश्मीरमध्ये सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश

जम्मू कश्मीरमध्ये हिंदुस्थानी सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सैन्याला यश आले आहे. मृत दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

शोपियां जिल्ह्यातील मलहोरा भागात काही दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती सैन्याला मिळाली. जवानांनी या भागात शोधमोहीम राबवली असता काही दहशतवाद्यांनी सैन्यावर गोळीबार केला. तेव्हा प्रत्युत्तरादाखल जवानांनी दहशतवाद्यांवर गोळीबार केला आणि चकमक उडाली. त्यात दोन दहशतवादी मारले गेले. दोन्ही दहशतवादी पळण्याच्या तयारीत होते पण जवानांनी त्यांना घेरले होते. मृत दहशतवाद्यांकडून एके ४७ रायफल, पिस्तुल आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

एक पोलीस शहीद

दक्षिण कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सोमवारी दहशतवाद्यांनी मोहम्मद असरफ भट या पोलीस अधिकार्‍यावर गोळी झाडली. त्यात भट हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु आज त्यांची प्राणज्योत मालवली.

आपली प्रतिक्रिया द्या