शिवसेनाप्रमुख हा माझा जणू दुसरा प्राण, प्रदीप शर्मा यांची आदरांजली

3616

आदरणीय शिवसेनाप्रमुख हे माझ्यावर खूप प्रेम करायचे. ते माझा जणू दुसरा प्राण होते, असा आदरभाव व्यक्त करत सुपरकॉप प्रदीप शर्मा यांनी रविवारी सकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली. शिवसेनाप्रमुख आणि माझे वेगळे नाते होते. यामुळेच जनसेवेसाठी मी शिवसेनेत आलो आहे. उद्धव ठाकरे देतील ती कामगिरी फत्ते करीन, असा विश्वास त्यांनी स्मारक स्थळी पुष्पहार अर्पण केल्यावर व्यक्त केला. यावेळी मांसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यालाही त्यांनी वंदन केले.

माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी शुक्रवारी सायंकाळी भगवा खांद्यावर घेत शिवसेनेत प्रवेश केला. ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शर्मा यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. उद्धव ठाकरे यांनी हाती शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.

सावरकर हे माझे आदरस्थान
स्वातंत्र्यवीर सावरकर हा ज्वलंत निखारा होता. माझ्यासाठी ते कायम आदरस्थानी आहेत, असा आदरभाव व्यक्त करत सुपरकॉप प्रदीप शर्मा यांनी रविवारी सकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आदरांजली वाहिली. सावरकर स्मारकात त्यांचे स्वागत कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, स्मारक अध्यक्ष अरुण जोशी यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पहार अर्पण केल्यावर शर्मा यांनी रणजित सावरकर यांच्याकडून स्मारकातील शिल्पे व उपक्रमांची माहिती घेतली. वीर सावरकर यांच्याविषयी अत्यंतिक आदरभाव व्यक्त करून शर्मा यांनी सावरकर यांनी दिलेल्या सावरकर साहित्याचा आणि सावरकर शिल्पक्रतीचा स्वीकार केला. स्मारकातील उपक्रमनची सविस्तर माहिती घेण्यासाठी पुन्हा येईन, अशी भावना व्यक्त करून शर्मा यांनी निरोप घेतला.

pradeep-sharma1

आपली प्रतिक्रिया द्या