Ben Stokes – स्टोक्सला टी-20 वर्ल्ड कप खेळण्याची संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हे दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहेत. मात्र, आगामी टी-20 विश्वचषकामध्ये या दोघांना स्थान मिळू शकते. या दोघांसाठी संघाचे दरवाजे नेहमी उघडे असतील, असे इंग्लंड संघाचे प्रशिक्षक मॅथ्यू मॉट यांनी सांगितले आहे. बेन स्टोक्स याच्यावर गुडघ्यावर नोव्हेंबर महिन्यात शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याने तो संध्या इंग्लंड संघाबाहेर आहे. तर जोफ्रा आर्चरदेखील मार्च महिन्यापासून दुखापतीमुळे इंग्लंडसाठी मैदानात उतरलेला नाही. हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यामध्ये आगामी काळात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करण्यात येणार आहे. या मालिकेपूर्वी दोघे तंदुरुस्त होण्याचा प्रयत्न करणार आहेत, असे मॉट यांनी सांगितले.