
आगामी महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी शुक्रवारी इंग्लंड संघाची घोषणा झाली. निवड झालेल्या 19 सदस्यीय संघात अष्टपैलू बेन स्टोक्स, खिस वोक्स व मार्क वुड या खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. याचबरोबर 2005नंतर प्रथमच होणाऱया पाकिस्तान दैऱयासाठीही इंग्लंडचा टी-20 संघ जाहीर झाला. फार्ममध्ये नसलेल्या जेसन रॉयची या दोन्ही संघात निवड झाली नाही.
पाकिस्तानविरुद्ध प्रमुख खेळाडूंना विश्रांती
टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान दौऱयावर जाणाऱया इंग्लंड संघात प्रमुख खेळाडू नसतील. खेळाडूंना दुखापत होऊ नये म्हणून ही खबरदारी होय. बेन स्टोक्स, जॉनी बेयरस्टो, लियाम लिविंगस्टोन व ख्रिस जॉर्डन या खेळाडूंचा पाकिस्तान दौऱयासाठीच्या इंग्लंड संघात समावेश नाहीये.
इंग्लंडचा टी-20 विश्वचषक संघ ः जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेयरस्टो, हॅरी ब्रुक, सॅम करण, ख्रिस जॉर्डन, लियाम लिविंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टोपली, बेन स्टोक्स, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड.
राखीव खेळाडू ः लियाम डॉसन, रिचर्ड ग्लीसन, टाइमल मिल्स.
पाकिस्तान दौऱयासाठी इंग्लंडचा टी-20 संघ ः जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, हॅरी ब्रुक, जॉर्डन कॉक्स, सॅम करण, बेन डकेट, लियाम डॉसन, रिचर्ड ग्लीसन, टॉम हेल्म, विल जॅक, डेव्हिड मालन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, ओली स्टोन, रीस टोपली, डेव्हिड विली, क्रिस वोक्स, ल्यूक वुड, मार्क वुड.



























































