सेक्स करताना कन्डोम वापरले नाही म्हणून डॉक्टरला अटक

23045
प्रातिनिधिक फोटो

सेक्स करताना कन्डोम न वापरणे एका डॉक्टरला चांगलेच महागात पडले आहे. ज्या महिलेसोबत त्या डॉक्टरने शारिरीक संबंध ठेवले होते तिने त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी डॉक्टरला अटक देखील करण्यात आली आहे.

ब्रिटनमध्ये ट्विकनहम येथे राहाणारे मॅथ्यू मिड्लसब्रॉग हे सरकारी रुग्णालयात डॉक्टर आहेत. त्यांची काही दिवसांपूर्वी टिंडर या डेटिंग अॅपवर एका महिलेशी ओळख झाली होती. त्यांनंतर त्यांनी एका दिवशी भेटायचे ठरवले. भेटले त्या दिवशी त्यांनी सेक्सही केला. मात्र नंतर त्या महिलेला समजले की सेक्स करताना मॅथ्यूने कन्डोम वापरलेले नाही. त्यामुळे तिने मॅथ्यूविरोधात पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मॅथ्यूला अटक देखील केली आहे. मॅथ्यूने मात्र त्याच्यावरील आरोप फेटाळले असून सेक्स हा दोघांच्या संमतीनेच झाल्याचे न्यायालयात सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या