
अमेरिकेतील प्राणिसंग्रहालयातील एका बिबट्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. अमेरिकेतील लुईसविला या प्राणिसंग्रहालयातील हा बिबट्या आहे. त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली असता तो पॉझिटिव्ह आढळून आला.
या बिबट्यासह आणखी दोन बिबटय़ांमध्ये श्वसनाचा आजार दिसून आला आहे. त्यांचेही नमुने घेण्यात आले. एक बिबट्या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱयांमध्ये खळबळ उडाली आहे. आता या बिबट्याला इतर प्राण्यांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे.
हा बिबट्या बर्फाळ प्रदेशात आढळणाऱया प्रकारातील असून त्याला एखाद्या लक्षण नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱयाकडून कोरोनाची लागण झाली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बिबट्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे आता प्राणिसंग्रहालयातील कर्मचारी हैराण झाले आहेत.
























































