यजमान इंग्लंडसाठी आजपासून बाद फेरी, लंडनमध्ये आज ऑस्ट्रेलियाशी सामना

28
england-vs-australia-world-cup-head-to-head

सामना ऑनलाईन । लंडन

गेल्या वर्षभरात दमदार कामगिरी… वर्ल्ड कप विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार… अन् यजमानीचे ऍडव्हाण्टेज… या सर्व बाबींमुळे इंग्लंड क्रिकेट संघाजवळ कधी नव्हे ते वलय निर्माण झाले होते. मात्र सुरुवातीला पाकिस्तान आणि त्यानंतर श्रीलंकेकडून पराभवाचा धक्का बसल्यानंतर इंग्लंडचे आकाशावरून सुसाट जात असलेले विमान दाणकन खाली आपटले. आता उद्या त्यांच्यासमोर गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे. त्यानंतर हिंदुस्थान व न्यूझीलंड या दोन फॉर्ममध्ये असलेल्या संघांचा त्यांना सामना करावयाचा आहे. याचाच अर्थ ओएन मॉर्गनच्या सेनेसाठी या तिन्ही लढती बाद फेरीसारख्याच असणार आहेत. याप्रसंगी ऍशेस या प्रतिष्ठेच्या मालिकेआधीच दोन संघांमधील युद्ध पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेटप्रेमी आतुर झाले आहेत.

वॉर्नर वि. आर्चर

बॉल टेम्परिंग प्रकरणात एक वर्षाची शिक्षा भोगून आल्यानंतर डेव्हिड वॉर्नरच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. आयपीएलनंतर वर्ल्ड कपमध्येही त्याने आपला ठसा उमटवलाय. जोफ्रा आर्चर या तेज गोलंदाजानेही इंग्लंडसाठी पहिल्यांदाच खेळताना आपली धमक दाखवलीय. या दोघांचे द्वंद्व उद्या क्रिकेटच्या रणांगणावर रंगेल. मात्र ऍरोन फिंच, स्टीवन स्मिथ, पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, ओएन मार्गन, जो रूट, जोस बटलर, जॉनी बेअरस्टॉ, मार्क वूड या दोन्ही संघांतील स्टार खेळाडूंच्या कामगिरीवर साऱयांच्या नजरा असतील.

आजची लढत

ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड (लंडन), दुपारी तीन वाजता

आपली प्रतिक्रिया द्या