…तरीही स्टोक्सचा विश्वविक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंग्लंडने आयर्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी क्रिकेट सामन्यात 10 विकेट राखून बाजी मारली. मात्र, या कसोटीत ना फलंदाजी… ना गोलंदाजी… ना यष्टिरक्षण… असे काहीच न करता जिंकणारा इंग्लंडचा बेन स्टोक्स क्रिकेटविश्वातील पहिला कर्णधार ठरला. 145 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फलंदाजी, गोलंदाजी आणि यष्टिरक्षण न करता सामना जिंकणारा बेन स्टोक्स हा पहिला कर्णधार ठरला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बेन स्टोक्सपूर्वी कोणत्याही देशाच्या कर्णधाराला असा विजय मिळाला नव्हता. दोन्ही देशांमधील हा केवळ दुसरा कसोटी सामना होता. विशेष म्हणजे 2019 मध्ये खेळलेला पहिला सामनाही चार दिवसांचा होता, जो इंग्लंडने 143 धावांनी जिंकला होता.