केबीसीच्या सेटवर अमिताभ बच्चन यांना दुखापत, पायाला पडले टाके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब़ॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन यांना ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर दुखापत झाली आहे. यामध्ये अमिताभ यांच्या पायाची नस कापली गेली असून त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अमिताभ यांनी  त्यांच्या ब्लॉगवरुन याबाबत माहिती दिली आहेे.

अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहीलेय की, सेटवर धातूचा धारदार तुकडा पायाला लागला आणि पायाची नस कापली गेली आहे. मात्र स्टाफ आणि डॉक्टरांनी वेळीच रक्तप्रवाह थांबण्यासाठी टाके घालण्यात आले आहेत. आता ते पूर्णपणे बरे असून काळजी करण्याची गरज नसल्याचे चाहत्यांना सांगितले आहे.  सोबतच अमिताभ यांना डॉक्टरांनी पायावर जोर देऊ नये, पायाची जास्त हालचाल करु नये तसेच ट्रेडमिलवरही वॉक करु नये असा सल्ला दिला आहे.

अमिताभ गेली अनेक वर्षे केबीसी हा शो होस्ट करत आहे. त्यामुळे या शोमध्ये अमिताभ यांना पसंती मिळत आहेत.  शो मध्ये अनेकदा अमिताभ आपल्या आयुष्यातील अनेक किस्से शेअर करताना दिसतात. स्पर्धकांसोबत मजामस्ती करतानाही ते दिसतात. तसेच शो च्या सेटवर अमिताभ बच्चन यांची बरीच काळजीही घेतली जाते.

11 ऑक्टोबरला अमिताभ यांनी त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी केबीसी या शोमध्ये एक खास एपिसोड ठेवण्यात आला होता. या एपिसोडमध्ये अमिताभ यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन देखील दिसले होते. अभिषेक बच्चनने शोमध्ये होस्टची खुर्ची ताब्यात घेतली. शोमध्ये अभिषेक आणि जया यांनी अमिताभ यांच्याशी संबंधित अनेक वैयक्तिक गोष्टी शेअर केल्या. अमिताभ यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांचीही कविता वाचण्यात आली, जी ऐकून ते भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले.