नो मेकअप लूक! उर्मिला कोठारेने स्वीकारले नवे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री उर्मिला कोठारेला याआधी आपण ग्लॅमरस रूपात पाहिले आहे. स्टार प्रवाहवर 2 मेपासून सुरू होणाऱ्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत पहिल्यांदाच ती नो मेकअप लूकमध्ये दिसणार आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी झगडणारी आई उर्मिला या मालिकेत साकारते आहे. त्यामुळेच साधी साडी आणि वेणी अशा नॉन ग्लॅमरस रूपात उर्मिला भेटीला येईल. या मालिकेचे कथानक नागपूरमधील एका गावात घडते. शूटसाठी खऱ्या गावाची निवड करण्यात आली आहे.