Photo – नो मेकअप लूकमध्ये ‘या’ अभिनेत्रीने जिंकले चाहत्यांचे मन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिग बॉस या रिअॅलिटी शो मधून प्रकाशझोतात आलेली एली अवरामने तिच्या क्युटनेस आणि निरागसतेमुळे चाहत्यांचे मन जिंकले आहे. ती कायम आपले वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. तिच्या फोटोंमुळे ती चर्चेत असते. पण सध्या तिच्या नो मेकअप लूक मधील फोटो प्रचंड व्हायरल होत असून सगळेच तिच्या फोटोंचे कौतुक करत आहेत.

डीप नेक असलेल्या पिवळ्या ड्रेसमध्ये एली अवरामने आपले फोटो इंस्टावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

एलीने या फोटोंमध्ये मेकअप केलेला नाहीय. तरीही ती या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत असून चाहत्यांचे तिने लक्ष वेधून घेतले आहे.

 

या फोटोंमध्ये एली झोपाळ्याचा आनंद घेताना दिसत आहे. तिच्यासोबत तिचा डॉगी असून तिने हॅप्पी सोल असे म्हंटले आहे.

एलीच्या फोटोंवर चाहते खुश असून कोणी तिला सुंदर, कोणी गॉर्जिअस तर कोणी तिला सनफ्लॉवर बोलून प्रतिक्रिया दिली आहे.

एलीच्या सुंदर फोटोंसोबत तिच्या साधेपणावर चाहते फिदा आहेत.

 

एली अवरामने बऱ्याच सिनेमांमध्ये काम केले आहे. नुकतीच तिचा ‘गणपत’ सिनेमा आला होता, ज्यामध्ये ती टायगर श्रॉफसोबत दिसली होती.