टिव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी आपल्या सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते. वयाच्या 43व्या वर्षातही आताच्या अभिनेत्रींना मागे टाकेल असे तिचे सौंदर्य आहे. श्वेता तिवारी दोन मुलांची आई आहे. मात्र तिचं सौंदर्य पाहून सगळेच थक्क होतात. तिने आता सोशल मीडीयावर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने समुद्रात फोटोच्या पोज दिल्या आहत. त्या फोंटोंमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत असून ती वेगवेगळ्या पोज देताना दिसली. यात तिने पांढऱ्या रंगाचे ब्रालेट आणि काळ्या रंगाच्या शॉर्ट्समध्ये दिसत आहे, त्यावर तिने काळ्या रंगाचे शूज आणि सनग्लासेस घातले आहेत. यावर एका चाहत्याने लिहीले की, नेमकं काय खातेस तू, दुसऱ्याने लिहीले की, आताही तुम्ही 18 वर्षाच्या मुलींना टक्कर देऊ शकता. शिवाय अनेक चाहत्यांनी सुंदर, गोड असे लिहीले आहे. सध्या श्वेता तिवारी थायलंडमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.