6 कोटी पीएफ खातेधारकांना दिलासा; ईपीएफओकडून व्याजदरात कपात नाही

epfo-pic

कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) 2020-21 या आर्थिक वर्षासाठी सुमारे 6 कोटी पीएफ खातेधारकांसाठी व्याजदर निश्चित केले आहेत. ईपीएफओच्या विश्वस्तांच्या श्रीनगरमध्ये झालेल्या बैठकीत आगामी आर्थिक वर्षासाठी 8.5 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. व्याजदरात कोणतीही कपात करण्यात आली नसल्याने सुमारे 6 कोटी खातेधारकांना दिलासा मिळाला आहे.

कोरोना संकटामुळे आगामी वर्षात पीएफच्या व्याजदरात कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. सध्या व्याजदर सात वर्षांच्या निचांकी स्तरावर आहेत. गेल्या आर्थिक वर्षातही 8.5 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आले होते. त्यात कोणतीही कपात करण्यात आली नसल्याने खातेधारकांना दिलासा मिळाला आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. विश्वस्तांच्या बोर्डाने 2021 साठी व्याजदरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. ईपीएफओला कर्ज आणि शेअरमधून चांगले उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे खातेधारकांना हा व्याजदर देणे शक्य असल्याचे सांगण्यात आले.

कोरोना संकटाच्या काळात अनेकांनी ईपीएफओमधून आगाऊ रक्कम घेतली आहे. त्याचप्रमाणे अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने पीएफमधील त्यांचे रक्कमही कमी झाली आहे. त्यामुळे ईपीएफओला पूर्वीप्रमाणे व्याज देणे कठीण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, व्याजदरात कपात करण्यात आली नसल्याने खातेधारकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षीसाठीही 8.5 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आले होते. आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात पीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना झटका देण्यात आला आहे. या खात्यांमध्ये एका वर्षात 2.5 लाखांपेक्षा जास्त पैसे गुंतवल्यास त्यावर मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स लावण्याचा प्रस्ताव आहे.

आपली प्रतिक्रिया द्या