भविष्य निर्वाह निधी कर्मचाऱ्यांचे 28 ऑगस्टला देशव्यापी आंदोलन

1366
epfo-pic

भविष्य निर्वाह निधीच्या ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीच्या कर्मचाऱयांना गेल्या कित्येक वर्षांपासून पदोन्नतीच दिली नाही. या अन्यायाविरोधात भविष्य निर्वाह निधी कर्मचारी संघटनेने वेळोवेळी आवाज उठवला. 9 डिसेंबर 2015 च्या बैठकीत तत्कालीन कामगारमंत्र्यांनी कर्मचाऱयांना मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु परिस्थिती अद्याप जैसे थेच आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेने 28 ऑगस्ट रोजी देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशाराही दिला आहे.

9 डिसेंबर 2015 रोजी तत्कालीन कामगारमंत्री आणि सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या अध्यक्षांसोबत कर्मचाऱयांची बैठक झाली. कॅडर फेररचनेत ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीच्या कर्मचाऱयांनाही न्याय देण्याचे आश्वासन दिले होते. त्याची अंमलबजावणी 27 डिसेंबर 2016 पासून होणार होती, परंतु तसे झाले नाही. याविरोधात हे आंदोलन पुकारले आहे.महाराष्ट्रात भविष्य निधी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस राकेश आचार्य यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जाईल.दरम्यान, निषेध म्हणून सर्व कर्मचारी 1 ऑगस्टपासून काळ्या फिती लावून येत आहेत, अशी माहिती आचार्य यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या