आंतरवासिता डॉक्टर्स संपावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

शासनाकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या वेतनात उदरनिर्वाह आणि शिक्षण होत नसल्याने वेतन वाढवून देण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आजपासून राज्यभरातील इंटर्नशिप करणारे डॉक्टर्स बेमुदत संपावर गेले आहेत. संभाजीनगरातील घाटी रुग्णालयातील १९० डॉक्टरही संपावर गेले असून, आज सकाळी सर्व विभागांंतील आंतरवासिता डॉक्टरांनी निषेध मोर्चा काढून घोषणाबाजी करत प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. हे डॉक्टर्स संपावर गेल्याने रुग्णसेवेवर परिणाम जाणऊ लागला आहे.

आज सकाळी या डॉक्टरांनी आपल्या मागण्या आणि शासनाचा निषेध करण्यासाठी घाटीतील सर्व विभागांतून निषेध मोर्चा काढला. या मोर्चात सुमारे १९० आंतरवासिता डॉक्टर सहभागी झाले. हातात फलक घेऊन घोषणा देत या डॉक्टरांनी अधिष्ठाता कार्यालय गाठून मागण्यांचे निवेदन दिले. सध्या या डॉक्टरांना सहा हजार रुपये वेतन मिळते. मागील वर्षी शासनाने ११ हजार रुपये वेतन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र वर्ष उलटले तरी त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. आता आम्हाला वेतन म्हणून दरमहा १५ हजार रुपये देण्यात यावेत, यासह कामे आणि कामांचे तास ठरवून देण्यात यावेत, सर्व आंतरवासित डॉक्टरांचे वेतन एकदाच वाढवावे, वाढीव वेतनवाढ पेâब्रुवारी २०१८ पासून लागू करावी आणि या संपामुळे आंतरवासिता कालावधी वाढवू नये आदी मागण्यांचे निवेदन प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांना देण्यात आले. निवेदनावर एएसएमआयचे सहसचिव किशोर डुकरे आणि इतर डॉक्टरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.