अत्यावश्यक वस्तू गावागावात पोहोचवणार; पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला शिवसेना धावली

मुसळधार पावसाने मराठवाडा, संभाजीनगर, पुण्यासह संपूर्ण राज्याला अक्षरशः झोडपून काढले असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पुराच्या पाण्यात आयुष्याची पुंजी वाहून गेल्याने जगायचे तरी कसे, असा प्रश्न बळीराजा पुढे उभा राहिला आहे. या पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धावली असून ‘एक हात मदतीचा’ ही मोहीम राबवली आहे. या मोहिमेच्या मदतीने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू गोळा करून शिवसेना शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणार आहे.

‘एक हात मदतीचा’ या मोहिमेच्या माध्यमातून कल्याण लोकसभा मतदार संघातील नागरिकांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन जिल्हा शाखेने केले आहे. या मोहिमेसाठी नागरिकांकडून अन्नधान्य, कपडे, चादर, ब्लँकेट्स, दैनंदिन वापरातील गरजेच्या वस्तू मदत स्वरूपात स्वीकारल्या जाणार आहेत. यावेळी कोणीही रोख रक्कम मदत स्वरूपात देऊ नये, असे आवाहन शिवसेनेच्या कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केले आहे. दरम्यान नागरिकांकडून जमा झालेल्या मदतीसोबतच कल्याण जिल्हा शाखेतर्फे अतिरिक्त मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवली जाणार असल्याची माहिती दीपेश म्हात्रे यांनी दिली.

मदतीसाठी संपर्क
डोंबिवली पूर्व : ओमनाथ नाटेकर ९८१९३२४१९६, कुणाल ढापरे ९८३३१८९४५७. डोंबिवली पश्चिम : प्रकाश तेलगोटे ९८९०५३८८९९, संजय पाटील ९३२३५९२८७५. ॥ मुंब्रा शहर : विजय कदम ९३२४६९००६७. दिवा शहर : सचिन पाटील ९८७०४६५०५०, रोहिदास मुंढे ९२२६२४९९९९. कळवा : लहू चाळके ८८७९२०२३१८, विजय देसाई ९९६७३२४८९७, कल्याण ग्रामीण : विजय भोईर ९०८२२०३१७२, भगवान पाटील ८०९७५४२७९७.