काय सांगता,  एका व्यक्तीला चंद्रावर दफन केले होते?

मनुष्याने विज्ञानात मोठी झेप घेतली असून त्याने चंद्र आणि मंगळवारही जाऊन आला आहे. आता विज्ञान आणि तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की काही वर्षात लोक चंद्रावर किंवा इतर ग्रहावर रहायला जाऊ शकतात. काही मोठ्या सेलिब्रिटी आणि श्रीमंत व्यक्तींनी चंद्रावर जमीनही विकत घेतल्याचे आपण ऐकले आहे. पण चंद्रावर एका व्यक्तीला दफन करण्यात आले होते ही बाबा फार कमी जणांना माहित आहे. विचित्र वाटत असली तरी ही गोष्ट  खरी आहे.

कोरा मराठीवर संग्राम पाखले यांनी ही माहिती शेअर केली आहे. युजिन शुमेकर असे या व्यक्तीचे नाव होते. आपला मृतदेह चंद्रावर दफन करावा अशी शेवटची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. पण युजिन शुमेकर ही व्यक्ती कोण होती आणि त्याची ही इच्छा कोणी पूर्ण केली असे प्रश्न आपल्याला पडणे सहाजिक आहेत.

युजिन शुमेकर शुमेकर हे खोप मोठे शास्त्रज्ञ होते. त्यांनी खगोलशास्त्रावर खुप अभ्यास आणि प्रयोग केले होते. त्यांनी 1960 मध्ये अमेरिकन भुगोलशास्त्रीय सर्व्हेमध्ये खगोलशास्त्रीय संशोधन प्रोग्राम केलेले आहेत. अपोलो मिशनच्या आंतराळवीराला चंद्राच्या पृष्ठभागावर नक्की काय शोधायला पाहिजे, याबाबत त्यांनी  प्रशिक्षण दिले होते.  शुमेकर यांना अंतराळवीर व्हायचे होते, पण काही वैद्यकीय कारणांमुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आलेले होते.

जुलै 1997 मध्ये ते ऑस्ट्रेलियात उल्कांचा शोध घेत असतानाच एका कार अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला. शुमेकरच्या सहकारी कॅरोलीन पॉर्को यांनी नासाला शुमेकरची शेवटची इच्छा सांगितली. नासाने ही इच्छा पुर्ण करण्याचे ठरवले.

नासाने सेलेस्टीस कंपनीला फोन करून याबाबत मदत करण्यास सांगितले. शुमेकर यांच्या अस्थी चंद्रावर पाठवण्यासाठी पॉली कार्बोनेट कॅप्सुल तयार करण्यात आली. त्यामध्ये शुमेकर यांच्या अस्थी ठेवण्यात आल्या होत्या.

1998 मध्ये चंद्रावर गेलेल्या ल्युनार प्रॉस्पेक्टर स्पेसक्राफ्ट या यानामधुन शुमेकर यांच्या अस्थी चंद्रावर गेल्या. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर त्यांच्या अस्थी असलेली ती पॉली कार्बोनेट कॅप्सुल दफन करण्यात आली.

शुमेकर यांची अंतीम इच्छा, चंद्राबद्दलच्या अभ्यासाची त्यांना असलेली आवड, चंद्राच्या संशोधनामध्ये त्यांनी घातलेली भर, त्यासाठी त्यांनी दिलेला वेळ यामुळेच नासाने त्यांची अंतीम इच्छा पुर्ण केली असे सांगण्यात येतं.

आपली प्रतिक्रिया द्या