
सोशल मीडियावर सध्या तरुणींनी केलेला ‘कोयल से तेरी बोली’ या गाण्यावरील डान्स चांगलाच व्हायरल झाला आहे. पावसाने हिरव्यागार झालेल्या निसर्गरम्य परिसरात साडी नेसून या तरुणींनी अक्षरशः धिंगाणाच घातला. त्यांच्या सुंदर, उत्साही सादरीकरणाने त्यांच्यावर काwतुकाचा वर्षाव होत आहे. हा व्हिडीओ creation_dance_studio या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला असून तरुणींच्या स्टेप्स आणि हावभाव पाहून नेटकऱयांनी त्या व्हिडीओला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे.





























































