हे करून पहा… पावसाळ्यात घरात एकही माशी दिसणार नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळ्यात घरात घोंगावणाऱ्या माश्यांमुळे अनेकदा मनस्ताप होतो. घरात अचानक माश्यांचा उपद्रव वाढला असेल तर तुम्हाला हे उपाय उपयुक्त ठरू शकतात.

घर नेहमी स्वच्छ ठेवा.

अन्न, पाणी, ज्यूस किंवा गोड पदार्थ खाली सांडले असतील तर ती जागा पुसून घ्या.

अन्न उघडे ठेवू नका.

कचऱ्याची बादली वेळोवेळी खाली करा.

दोन कप उकळलेल्या पाण्यात एक चमचा मीठ आणि थोडी काळी मिरी पावडर मिसळा. हे मिश्रण थंड झाल्यावर स्प्रे बाटलीमध्ये भरून माश्या असलेल्या ठिकाणी स्प्रे करा.