
सध्या सोशल मीडियावर उंदीर आणि मुलांचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये घरात शिरलेल्या उंदराला मुलं चप्पलेने मारत घराबाहेर फेकून देतात. जसा उंदीर घरात शिरतो तसे ते तरुण त्यावर हल्ला करतात. एक मुलगा चप्पलेने उंदराला मारतो. दुसरा उंदराची शेपटी पकडतो आणि चेंडूसारखा त्याला बाहेर फेकून देतो. हा व्हिडीओ एक्सच्या @Shibyash_17 या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे.
नेटकऱ्याने लिहिले, “बिचारा कुठे जाऊन अडकला!’’ तर दुसऱ्याने म्हटले, “हे तर आयटी कॉर्पोरेट कल्चरसारखं आहे.’’ अखेर उंदराला पळवून लावण्यात ही मुलं यशस्वी ठरतात.





























































