किमान पाचवी पास विद्यार्थी होणार दहावी पास; 17 नंबरच्या अर्जाची नावनोंदणी आता शाळांमधून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये होणाऱया दहावी-बारावी परीक्षेसाठी 17 नंबरचा परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदा प्रथमच 17 नंबरचा अर्ज भरून दहावीच्या परीक्षेला बसणाऱया विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज शाळांमधून स्वीकारण्यात येणार आहेत. फेब्रुवारी-मार्च 2024 च्या बोर्डाच्या परीक्षेपासून विद्यार्थी संपर्क पेंद्रांऐवजी नजीकच्या शाळेत जाऊन नावनोंदणी अर्ज भरू शकतात.

शिक्षण प्रवाहाच्या बाहेर राहिलेल्या परंतु किमान पाचवी पास असलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेस बसून पुन्हा शिक्षण प्रवाहात येण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिन अनुराधा ओक यांनी शाळांना दिल्या आहेत.

17 नंबरचा परीक्षा अर्ज दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. त्यामुळे कोणताही ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही. तसेच भरलेल्या अर्जाची प्रत शाळांमध्ये जमा करायची आहे.

वेबसाईट
– दहावी – http://form17.mh-ssc.ac.in
– बारावी – http://form17.mh-hsc.ac.in
– नावनोंदणी अर्ज, शुल्क भरणे – (बारावी) 10 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर, (दहावी) 14 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर
– शुल्कपावती, कागदपत्रे जमा करणे – (बारावी) 12 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर, (दहावी) 17 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर
– विद्यार्थ्यांचे अर्ज बोर्डाकडे जमा करणे – (बारावी-दहावी) – 15 सप्टेंबर