
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यासाठी रविवारी मतदान पार पडले. मतदान संपल्यानंतर अनेक वृत्तवाहिन्याने एक्झिट पोल दाखवण्यास सुरूवात केली. एनडीएला बहुमत मिळणार असे भाकीत बहुतांश पोलमधून करण्यात आले. यावर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू कश्मीरचे माजी मुख्यमंत्री यांनी सगळेच एक्झिट पोल चुकीचे नसतता असे मत व्यक्त केले आहे. तसेच 23 तारखेची वाट पहा असेही नमूद केले आहे.
Every single exit poll can’t be wrong! Time to switch off the TV, log out of social media & wait to see if the world is still spinning on its axis on the 23rd.
— Omar Abdullah (@OmarAbdullah) May 19, 2019
अब्दुल्ला यांनी ट्विट करून म्हटले आहे की, “प्रत्येक एक्झिट पोल चुकीचे ठरत नाही. टीव्ही बंद करण्याची वेळ आली आस्त. तसेच सोशल मीडियावर लॉग आऊट करा आणि 23 मे रोजी पृथ्वी नेहमीप्रमाणे गोल फिरते का हे पहा.”
























































