
भाषा, परंपरा, संस्कृती आणि विविधतेमध्येच मणिपूरचे सामर्थ्य असून राज्यात शांततेसाठी सर्वच समुदायांनी सहकार्य करण्याचे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. हिंसाचाराने पोळलेल्या मणिपूरमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट आहे. राष्ट्रपती मुर्मू या सध्या मणिपूरच्या दौऱयावर असून त्यांनी सेनापती आणि कांगपोकपी जिह्यातील विविध समुदायांसोबत आज संवाद साधला. हिंदुस्थानच्या सरकारला मणिपूरमधील नागरिकांच्या इच्छा आणि आकांक्षाची जाणीव आहे.

























































