‘ईव्हीएम’मुळे हिंदुस्थानातील लोकशाही उद्ध्वस्त होण्याचा धोका, कॉँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केली भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणुकीतील ‘ईव्हीएम’च्या वापरामुळे हिंदुस्थानातील लोकशाही उद्ध्वस्त होण्याचा सर्वाधिक धोका आहे. आपण या निवडणुकीत बॅलेट पेपरचा वापर केला नाही तर 2024 ची निवडणूक ही देशातील अंतिम निवडणूक ठरेल, अशी भीती कॉँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केली आहे.


‘फेसबुकने उद्ध्वस्त केलेली लोकशाही’ असा एक व्हिडीओ दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवरून शेअर केला आहे. यामध्ये पत्रकार कॅरल कॅडकॉलर यांनी निवडणुकीत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्य़ा हेराफेरीवर भाष्य करण्यात आले आहे. याकडे लक्ष वेधत त्यांनी देशातील राजकारणाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

ईव्हीएम व अन्य आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात गोंधळ आणि फेरफार केला जात असल्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे. आपण निवडणुकीत बॅलेट पेपरचा वापर केला नाही तर 2024 ची निवडणूक हिंदुस्थानच्या राजकारणातील अंतिम निवडणूक ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.