बुलढाण्यात ईव्हीएम मशीनला थ्री टायर सिक्युरिटी

1586

बुलढाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघाच्या ईव्हीएम मशीन ठेवलेल्या ठिकाणी थ्री टायर सिक्युरिटी सिस्टीम राहणार आहे. या सात ठिकाणी बीएसएफ, आरपीएफ, एसआरपीच्या जवानांसह अधिकारी व जिल्ह्यातील पोलीस असा 750 शस्त्रधारी कर्मचार्‍यांचा व 60 अधिकार्‍यांचा कडेकोट बंदोबस्त आहे. सोमवारी रात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत हा बंदोबस्त राहणार आहे. ईव्हीएम मशीन कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी सांगितले.

जिल्ह्यात सात विधानसभा मतदार संघात मतदान होऊन ईव्हीएम मशीन बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या सामाजिक न्याय भवन चिखली रोड बुलढाणा येथे तर चिखली विधानसभा मतदार संघाच्या तालुका क्रीडा संकुल चिखली, मलकापूर मतदारसंघाच्या कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूरमध्ये, सिंदखेडराजा मतदार संघाच्या वखार महामंडळाचे गोडावूनमध्ये, मेहकर मतदार संघाच्या वखार महामंडळाचे गोडावून डोणगाव रोड मेहकर, जळगाव जामोद मतदार संघाचे शासकीय धान्य गोदाम जळगाव जामोद, खामगाव मतदार संघाचे जे.पी. मेहता हायस्कूल खामगाव येथे ठेवल्या असून तिथेच मतमोजणी होणार आहे. त्या परिसराला थ्री टायर सिक्युरिटी देण्यात आली आहे. त्यामध्ये ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या रुमभोवती बीएसएफ व आरपीएफ अधिकारी कर्मचार्‍यांची सिक्युरिटी आहे. तर इमारतीभोवती दुसरी तुकडी एसआरपीची राहणार असून तिसरी सिक्युरिटी या संपूर्ण परिसराभोवती स्थानिक पोलीस अधिकारी कर्मचार्‍यांची राहणार आहे. सात विधानसभा मतदारसंघात 750 शस्त्रधारी कर्मचारी व 60 अधिकारी दिवसरात्र तैनात आहेत. या संपूर्ण परिसरावर सीसीटीव्ही कॅमेर्‍याची नजर आहे. तसेच परिसरावर नजर ठेवण्यासाठी चारही बाजूने मचान उभारण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या