
सामना ऑनलाईन, मुंबई
ब्रेकअप झालेला असतानाही मावशीच्या मुलीचे लग्न ठरले म्हणून विवाहित तरुणाची सटकली. त्याने फेसबुक मेसेजवर तिचे फोटो व्हायरल करण्यास सुरुवात केली. याबाबत तरुणीने तक्रार देताच टिळकनगर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. इम्रान शाबीर अली शहा (30) असे या मजनूचे नाव असून तो मरोळमध्ये राहतो. हार्डवेअरचे काम करणाऱ्या इम्रानचे त्याच्या मावशीची मुलगी रेश्मा (नाव बदललेले) हिच्याशी प्रेमसंबंध होते. दरम्यान, इम्रानचे लग्न झाले आणि दोघांमध्ये ब्रेकअप झाला. त्यानंतर डॉक्टरी करणाऱ्या रेश्माचे लग्न ठरल्याचे इम्रानला समजताच त्याने फेसबुकवर तिचे फोटो व्हायरल केले. तक्रारीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार उपनिरीक्षक दीपमाला जाधव, काळेकर व पथकाने त्याला बेडय़ा ठोकल्या.

























































