इंग्लंडच्या माजी कर्णधाराने वयाच्या 48 व्या वर्षी केलं दुसरं लग्न; पत्नी 18 वर्षांनी लहान, फोटो व्हायरल

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात सध्या अॅशेस मालिका सुरू आहे. या मालिकेमध्ये पहिले तिन्ही सामने जिंकत पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा बेझबॉलचा धुव्वा उडवला आहे. यामुळे इंग्लंडच्या संघावर चौफेर टीका होत आहे. एकीकडे या मालिकेची चर्चा असतानाच दुसरीकडे इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्र्यूज स्ट्रॉस पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकला आहे. पहिली पत्नी रुथ स्ट्रॉस हिच्या निधनानंतर सात वर्षांनी 48 वर्षीय स्ट्रॉस याने अँटोनिया लिनियस पीट हिच्याशी लग्न केले आहे. अँटोनिया ही 30 वर्षांची असून अँड्र्यू स्ट्रॉस आणि तिच्या वयात 18 वर्षांचे अंतर आहे.

अँड्र्यू स्ट्रॉस आणि अँटोनिया लिनियस-पीट यांनी दक्षिण आफ्रिकेतील फ्रॅन्शहॉक येथे एक खासगी समारंभ आयोजित करत विवाह केला. स्ट्रॉसने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना ही गुड न्यूज दिली. या लग्नाला दोघांच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळचे लोक उपस्थित होते.

हा सुंदर दिवस आणि क्षण जगातील त्यांच्या आवडत्या ठिकाणी साजरा केला. माझ्यावर आणि माझ्या मुलांवर प्रेमा केल्याबद्दल तुझे आभार. तू मला भेटले हे माझे भाग्य आहे, असे कॅप्शन स्ट्रॉसने या फोटोंना दिले आहे.

अँटोनिया लिनियस-पीट ही पीआर एक्झिक्युटीव्ह म्हणून काम करत होती. आती ती स्वत:ची लिनियस फाईन आर्ट ॲडव्हायझरी लिमिटेड’ ही कंपनी चालवते. स्ट्रॉसची ती चांगली मैत्रिण होती आणि आता त्याने तिच्या लग्नही केले. स्ट्रॉसची पहिली पत्नी रुथ हिचे डिसेंबर 201 मध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे निधन झाले होते. त्यांना सॅम्युएल आणि लुका ही मुले असून लग्नातील फोटोंमध्येही दोघे दिसत आहेत.

दरम्यान, स्ट्रॉसने 2019 मध्ये पत्नीच्या आठवडणीत रुथ स्ट्रॉस फाऊंडेशनची स्थापना केली होती. ही संस्था कर्करोगामुळे पालकांना गमावणाऱ्या कुटुंबांना मदत करते आणि धूम्रपानाशी संबंधित नसलेल्या फुफ्फुसाच्या कर्करोगावर संशोधन करण्यासाठी निधी उभारते. या कार्यासाठी आणि क्रिकेटमधील योगदानासाठी स्ट्रॉसला ‘नाईटहूड’ (सर पदवी) देऊन सन्मानित करण्यात आले आहे.