धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेशासाठी अभ्यासगट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धनगर समाजाचे अनुसूचित जमातीमध्ये समावेशाच्या अनुषंगाने सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्यात आल्याची घोषणा मंत्री सुरेश खाडे यांनी आज विधानसभेत केली. तसेच धनगर समाजाच्या योजना जलदगतीने राबविण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ‘कृती दल’ स्थापन करण्यात आले आहे.

या अभ्यासगटाला मध्य प्रदेश, बिहार, तेलंगणा, छत्तीसगड व उत्तर प्रदेश या राज्यांतील अनुसूचित जाती-जमातीमध्ये समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने अवलंबिलेल्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून अहवाल सादर करावयाचा आहे. सद्यःस्थितीत सदर अभ्यासगटाने मध्य प्रदेश, बिहार, तेलंगणा या राज्यांचा अभ्यासदौरा केला असून उर्वरित राज्यातील अभ्यास करून एकत्रित अहवाल सादर केल्यानंतर सदर अहवालातील शिफारशी राज्य मागासवर्ग आयोगाकडून तपासून त्यानुषंगाने योग्य तो सकारात्मक निर्णय शासनस्तरावर घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.