
>> अभिषेक भटपल्लीवार । गडचिरोली
गडचिरोलीच्या कुरखेड्यात नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात 15 जवान शहीद झाले तर खासगी गाडीचा वाहनचालकही ठार झाल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. या घटनेसंदर्भात मी पोलीस महासंचालकांशी चर्चा केली आहे, असे देखील ते म्हणाले.
देशात सुरू असलेल्या लोकसभेच्या निवडणुका शांततेत पार पडत आहेत. महाराष्ट्रात देखील मतदान शांततेत पार पडले. लोकशाहीच्या या उत्सवात गडचिरोलीसारख्या नक्षलप्रभावीत भागात देखील उत्स्फुर्त मतदान झाले. नक्षलवाद्यांच्या धमक्यांना झुगारून गावकऱ्यांनी मतदान केले. यामुळेच संतापलेल्या नक्षलवाद्यांनी हा भ्याड हल्ला केल्याचे देखील मुनगंटीवार यावेळी म्हणाले.




























































