शाळेत उपस्थित राहण्याच्या सक्तीतून शिक्षकांची सुटका, 50 टक्के उपस्थितीची अट शिथिल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

मुंबई महानगर क्षेत्रातील पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शाळेत उपस्थित राहण्याच्या सक्तीतून सुटका करण्यात आली आहे. शिक्षकांना लोकल प्रवासाची परवानगी नसल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने हा निर्णय घेतला असून पुढील आदेश येईपर्यंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 50 टक्के उपस्थितीची अट शिथिल करण्यात आली आहे.

शाळेत उपस्थित न राहण्याच्या सवलतीचा लाभ मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, वसई- विरार, मीरा-भाईंदर, पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी याविषयीचे निर्देश जारी केले आहेत. दहावी, बारावीचा निकाल वेळेत पूर्ण करायचा असल्याने या शिक्षकांना निर्धारित वेळेत शाळेत उपस्थित राहून निकालाचे काम पूर्ण करायचे आहे, असेही जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

  •  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आबासाहेब जऱहाड यांनी मावळते अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव यांच्याकडून पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताना मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे, अधिकारी वर्ग उपस्थित होता.