
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सोहळय़ानिमित्त दादरमधील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भ कक्षात दुर्मिळ साहित्याचे प्रदर्शन शनिवार, 13 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. स्वातंत्र्याचे महत्त्व आणि लोकांचे योगदान विशद करणारे 1947 ते 2016 या कालावधीतील ‘चित्रमय जगत’, ‘सत्यकथा’, ‘वसंत’, ‘माणूस’ इत्यादीतील निवडक लेख, पुस्तके, छायाचित्रे यांचा या प्रदर्शनात समावेश आहे. हे प्रदर्शन सोमवार सुट्टीचा दिवस सोडून दररोज सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत 20 ऑगस्टपर्यंत खुले राहणार आहे.


























































