असं झालं तर… पासपोर्टचे नूतनीकरण विसरलात तर…

1 पासपोर्ट काढल्यानंतर त्याचे दिलेल्या तारखेला नूतनीकरण आवश्यक आहे. जर तुम्ही दिलेल्या तारखेला नूतनीकरण करायचे विसरलात तर काय कराल.

2 सर्वात आधी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पासपोर्ट सेवा वेबसाइटला भेट देऊन तत्काळ ऑनलाइन अर्ज भरा आणि त्यासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

3 ऑफलाइन अर्ज भरायचा असल्यास तुम्ही सविस्तर अर्ज भरून सर्व आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्रात जाऊन रीतसर अर्ज जमा करू शकता.

4 जर तुमचा पासपोर्ट कालबाह्य होऊन एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ झाला असेल, तर तुम्हाला पुन्हा पोलीस पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

5 पासपोर्टची मुदत संपल्यावर तुम्ही त्याचा वापर ओळखीचा पुरावा म्हणून किंवा प्रवासासाठी करू शकत नाही. पासपोर्टचे नूतनीकरण वेळेवर करणे आवश्यक आहे.