कुपवाडात दहशतवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला; पुलाखाली ठेवलेली स्फोटके निष्क्रिय करण्यात यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरच्या कुपवाडामध्ये दहशतवाद्यांचा घातपाताचा डाव सुरक्षा दलाने उधळून लावला आहे. घातपात करण्याच्या हेतूने दहशतवाद्यांनी कुपवाडातील एका पूलाखाली स्फोटके ठेवली होती. ही स्फोटके निष्क्रिय करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचा घातपताचा डाव फसला आहे. जम्मू कश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात घातपात घडवण्याचे प्रयत्न दहशतवाद्यांकडून होत आहेत.

कुपवाडातील आरामपोरामध्ये सोपोर-कुपवाडा पुलाखाली दहशतवद्यांनी स्फोटके ठेवली होती. याबाबत संशय आल्यानंतर सीआरपीएफ आणि लष्कराच्या रोड ओपनिंग पथकाने त्याची तपासणी केली. त्यात स्फोटके आढळल्यावर बॉम्बनाशक पथकाला बोलावण्यात आले. या पथकाने घटनास्थळी पोहचून स्फोटके निष्क्रिय केली आहेत. दहशतवाद्यांकडून कश्मीर खोऱ्यात घातपात घडवण्याचे प्रयत्न होत आहेत. घातपाताच्या हेतूने दहशतवाद्यांनी पुलाखाली आयईडी पेरून ठेवले होते. बॉम्बनाशक पथकाच्या मदतीने स्फोटके निष्क्रिय करण्यात आल्याने मोठा धोका टळल्याचे कुपवाडाच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले.