
हिंदुस्थानी लष्कराच्या रोमियो फोर्स आणि जम्मू-कश्मीर पोलिसांनी आज पूँछ जिह्यातील सुरनकोट येथे एका दहशतवाद्यांच्या ठिकाणावर छापा घातला. याठिकाणावरून पाच स्फोटके, रेडिओ उपकरण, दुर्बीण आणि ब्लँकेट जप्त करण्यात आले. त्याचबरोबर स्टिलच्या बादलीमध्ये दोन आयईडी लावल्याचेही यावेळी आढळून आले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणाहून दोन वायरलेस सेट, युरियाची पाच पाकिटे, पाच लिटरचा गॅस सिलिंडर, दुर्बिण, तीन लोकरीच्या टोप्या, तीन ब्लँकेट आणि भांडी ताब्यात घेण्यात आली.