फेसबुकवर सतत असता सक्रिय? होऊ शकतात ‘हे’ आजार…

आपण जर फेसबुकवर सतत सक्रिय असाल, तर आपल्याला काळजी घेण्याची आवश्यकता आहे. फेबूकचा अतिवापर केल्याने तुम्ही विविध आजारांना बळी पडू शकता. नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून असे समोर आले आहे की, आपण जितका वेळ फेसबुकचा वार करता, तितकीच आपल्यात निराशेची आणि दुःखाची भावना निर्मण होऊ शकते.

प्रत्येक व्यक्ती किमान 50 मिनिटे वापरतो फेसबुक

कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार असे आढळले आहे की, प्रत्येक व्यक्ती सरासरी दररोज 50 मिनिटे फेसबुकवर खर्च करतो. येल विद्यापीठाचे निकोलस ए क्रिस्टाकिस यांनी 2013, 2014 आणि 2015 मधील वेगवेगळ्या परिस्थितीचा अभ्यास केला असता हीच गोष्ट समोर आली आहे.

मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम

या अभ्यासानुसार, फेसबुकवर जास्त वेळ घालवणाऱ्या व्यक्तींमध्ये नकारात्मकता वाढते. तसेच फेसबुक स्टेटस अपडेट केल्यावर, इतरांचे स्टेटस पाहिल्यावर, लाईक करुन किंवा लिंक वर क्लिक केल्यावर वापरकर्त्याचे मानसिक स्वास्थावर परिणाम होत असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. फेसबुकचा अतिवापर केल्याने अनेक व्यक्ती डिप्रेशनमध्येही गेल्याचे या अभ्यासात सांगण्यात आले आहे.

असंतोषाची भावना वाढते

संशोधकांना असे आढळले आहे की, फेसबुकवर अतिप्रमाणात इतरांच्या पोस्ट पाहून आणि लाईक करून वापरकर्त्यामध्ये असंतोषाची भावना वाढवते.

आपली प्रतिक्रिया द्या