
फेसबुकची मूळ कंपनी मेटा इंडियाचे प्रमुख अजित मोहन यांनी अचानक राजीनामा दिला. त्यामुळे फेसबुकच्या कर्मचायांना धक्का बसला आहे. अजित मोहन हे जानेवारी 2019 मध्ये फेसबुक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून रुजू झाले होते. याआधी उमंग बेदी या फेसबुक इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक होत्या. अजित मोहन यांच्या राजीनाम्याची माहिती मेटा प्लॅटफॉर्मने जाहीर केली आहे. मोहन यांनी राजीनामा दिल्यानंतर मेटा इंडियाचे संचालक आणि भागीदार मनीष चोप्रा हे त्यांच्या जागी कंपनीचा कार्यभार स्वीकारतील.





















































