Facebook, Instagram down : फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झालेल्यानं यूजर्स हैराण

facebook-instagram-meta-fb-insta

प्रसिद्ध सोशल मीडिया हँडल Facebook आणि Instagram ठप्प झाल्याच्या तक्रारी गेल्या काही तासांपासून येऊ लागल्या आहेत. X वर अनेक युजर्सनी पोस्ट केलं आहे. अनेकांनी मेटाच्या सेवेवर नाराजी व्यक्त केली आहे. सर्वच युजर्सना हा त्रास जाणवत नसला तरी काही युजर्सना फेसबुक आणि इंस्टाग्राम ठप्प झाल्यानं अडचण निर्माण झाली आहे.

इंस्टाग्राम आणि फेसबुकसह विविध मेटा ॲप्लिकेशन्स डाउन झाल्याची माहिती आहे, परंतु ही समस्या सर्व युजर्सना जाणवत नाही. न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्नियाच्या आसपास केंद्रित झालेल्या आउटेजमुळे ही सेवा विस्कळीत झाल्याचं बोललं जात आहे. मात्र अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
काहींच्या म्हणण्यानुसार ही सर्व्हर-साइड समस्या असू शकते, जी लवकरच सोडवणं आवश्यक आहे.

इंस्टाग्राम आणि फेसबुक बंद झाल्याच्या तक्रारी बऱ्याच वेळापासून डाउनडिटेक्टरवर दिसू लागल्या. थ्रेड्समध्ये देखील व्यत्यय येत असल्याचं दिसत आहे.

मार्चमध्येही ही समस्या निर्माण झाली होती

मार्चच्या मध्यातही फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झाल्यामुळे युजर्सना अडचणींचा सामना करावा लागला होता. यादरम्यान मेटा प्लॅटफॉर्मच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया ॲप्समध्ये गडबड झाली.

अमेरिका, युरोप, ब्रिटन आणि आशियातील अनेक भागांतून तक्रारी आल्या. युजर्सनी सांगितलं होतं की ते सेवा वापरू शकत नाहीत. युजर्सना विविध प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत होता.

या काळात लाखो लोकांनी X वरून आपल्या समस्यांबाबत तक्रारी केल्या होत्या. डाऊन डिटेक्टर जगभरातील अशा तांत्रिक समस्यांवर लक्ष ठेवतो.

मार्चच्या सुरुवातीलाही अशाच समस्या आल्या होत्या आणि मेटा प्लॅटफॉर्मचे सोशल मीडिया ॲप्स क्रॅश झाले होते. ॲप्स आपोआप लॉग आउट झाले, त्यामुळे लोक लॉग इन करू शकले नाहीत.