आता फेसबुकवर दिसणार नाही लाईक्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध सोशल मीडिया साईट असलेल्या फेसबुकवर प्रत्येकाला आपल्या पोस्टला भरपूर लाईक्स व कमेंट मिळाव्या अशी आशा असते. एखाद्याच्या पोस्टला मिळणाऱ्या लाईक्सवरून त्या व्यक्तीच्या प्रसिद्धीचा देखील अंदाज घेतला जातो. अनेकदा या लाईक्सच्या शर्यतींमुळे वाद निर्माण झाल्याचे प्रकार देखील घडले आहे. याला सोशल मीडियामध्ये ‘लाईक्स वॉर’ म्हटले जाते.

हे असे लाईक्स वॉर थांबविण्यासाठी फेसबुककडून लाईक्स दाखवणे थांबविण्यात येणार आहे. यापुढे आपण कुणाच्याही पोस्टवरचे लाईक्स बघू शकणार नाही तर आपल्या स्वत:च्या पोस्टवरील लाईक्स देखील फक्त आपणच बघू शकणार आहेत. सध्या ऑस्ट्रेलियामध्ये हा नवा नियम लागू झाला असून लवकरच इतर देशात देखील हा नियम लागू होणार आहे.