
सोशल मीडियात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुकला आता टिकटॉकने मागे टाकले आहे. 2019 यावर्षी फेसबुक डाऊनलोड करणाऱयांची संख्या 11 टक्क्यांनी कमी झाल्याने टिकटॉक पहिल्या स्थानाकर पोहोचले आहे.
मोबाइल मार्केटिंग डाटा कंपनीकडून करण्यात आलेल्या ताज्या रॅकिंगच्या माहितीनुसार डाऊनलोड करण्यात आलेल्या 10 ऍप्सपैकी सात ऍप्स हे सोशल मीडिया किंवा कम्युनिकेशन्स संबंधी ऍप्स आहेत. फेसबुक यावर्षी डाऊनलोड करण्यात मागे पडले असले तरी गेल्या दशकभरापासून सोशल मीडियात सर्वाधिक डाऊनलोड झालेल्यांच्या यादीत फेसबुक अद्यापही अक्कल स्थानी अबाधित आहे. डाऊनलोड केलेल्या ऍप्समध्ये व्हाॅट्सऍपचा तिसरा क्रमांक आहे.
यूजर्स किती
- गेल्या दहा वर्षांत फेसबुकचे 460 कोटी, फेसबुक मेसेंजरचे 440 कोटी, व्हाॅट्सऍपचे 430 कोटी, इन्स्टाग्रामचे 270 कोटी, स>@पचॅटचे 150 कोटी, स्काईपचे 130 कोटी, टिकटॉकचे 130 कोटी, यूसी ब्राऊजरचे 130 कोटी, यूटय़ूबचे 130 कोटी, ट्विटरचे 100 कोटी ऍप यूजर आहेत.
- नेटफ्लिक्स, टिंडर, पेंडोरा म्युझिक, टेनसेंट व्हिडीओ, आयक्यूयी, स्पॉटीफाय, यूटय़ूब, एचबीओ नाऊ, क्काई या ऍपला लोकांनी मनोरंजन म्हणून पसंती दिली आहे.
- सब के सर्फर, कँडीक्रॅश, टेंपल रन 2, माय टॉकिंग टॉम, क्लॅश ऑफ क्लांस, पोऊ, हिल क्लाइंब रेसिंग, मिनियन रश, फ्रुट निंजा, 8 बॉल पूल, यासारख्या ऍप्सला छोटय़ा मुलांनी पसंती दिली आहे.
- 2019 मध्ये 12 हजार कोटी ऍप इंस्टॉल करण्यात आले आहेत. 2018 वर्षीच्या तुलनेत 5 टक्के काढ झाली आहे.





























































