दहावी, बारावीच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या दाखल्यांची गरज असते. हे दाखले विद्यार्थ्यांना वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना घराजवळच दाखला उपलब्ध करून देण्याचा विचार प्रशासन करीत असून त्यासाठी नजीकच्या महा ई-सेवा केंद्रात दाखल्यासाठी अर्ज करण्याची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महा ई-सेवा केंद्रात जाऊन अथवा आपले सरकार या पोर्टलवरून दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. निकालानंतर विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी विद्यार्थी-पालकांची सेतू केंद्रावर गर्दी होते. एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांचे दाखला उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनावरही ताण येतो. यातून अनेकदा वेळेत दाखला न मिळाल्याने नागरिक आणि सरकारी कर्मचाऱयांमध्ये वादाची ठिणगी पडते. प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना दाखला मिळाला नाही तर त्यांच्या प्रवेशात अडचणी निर्माण होऊ शकतात. या सर्व पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना दाखल्यांसाठी नागरी सुविधा केंद्रावर चकरा माराव्या लागू नये यासाठी ऑनलाइन पद्धतीने दाखले दिले जाणार आहेत. यासाठी ऑनलाइन पद्धतीने दाखले देण्यात येणार असून विद्यार्थ्यांना तातडीने अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
निकाल लागला, पुढे काय?
बारावीचा निकाल 21 मे रोजी तर 10 वीचा निकाल 27 मे रोजी लागला आहे. हे दोन्ही निकाल लागल्याने आता विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी सज्ज झाले आहेत. परंतु, या प्रवेशासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी करणे गरजेच्या असून त्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे काढावी लागणार आहेत.
असे शोधा महा ई-सेवा केंद्र
महा ई-सेवा केंद्रातूनच दाखले देण्यात येणार आहे. या केंद्राची यादी aaplesarkar.mahaonline.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वेबसाईटवर गेल्यावर संपर्क यावर क्लिक केल्यावर आपला जिल्हा आणि तालुका निवडावा लागणार आहे.
वेबसाईटवरूनही दाखला मिळणार
‘आपले सरकार’ या वेबसाईटवरूनही डिजिटल स्वाक्षरी असलेले दाखले सुद्धा विद्यार्थ्यांना ऑनलाइन मिळणार आहेत. यासाठी अर्जदाराने ‘आपले सरकार’ या वेबसाईटवर जाऊन लॉगीन करणे आवश्यक आहे. वेबसाईटवर यासंबंधी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
दाखल्यांसाठी कागदपत्रे
l उत्पन्नाचा दाखला – अर्ज, स्व-घोषणापत्र, पह्टो, वीज बिल, कर पावती, रेशनकार्ड यापैकी एक, फॉर्म 16 किंवा तलाठय़ाकडील उत्पन्नाचा दाखला.
l अधिवास दाखला – स्व-घोषणापत्र, पह्टो, विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला, रहिवासी पुराव्यासाठी विजेचे बिल, कर पावती, आधारकार्ड.
l नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र – स्व-घोषणापत्र, पह्टो, लाभार्थ्याचे जात प्रमाणपत्र, लाभार्थी आणि वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, तीन वर्षांच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र, विजेचे बिल, आधारकार्ड.