
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा आतापर्यंत वेगळ्या विदर्भाच्या बाजूने भूमिका ठेवली आहे. भाजपची भूमिका वेगळय़ा विदर्भाच्या बाजूची असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी केली आहे. यावर बावनकुळे यांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा काँग्रेस पक्ष आता काढत आहे, मात्र हा मुद्दा भाजपच्या अजेंड्यामध्ये आहे. त्यावर पहिल्यापासूनच काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.


























































